आरोग्य व शिक्षण

रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन धुमधडाक्यात साजरा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन धुमधडाक्यात साजरा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोपरगाव -: शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन धुमधडाक्यात, देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमासाठी कोपरगाव शहराचे भूषण असलेले माजी नगराध्यक्ष तसेच ‘सकाळ’ समुहातर्फे महाराष्ट्र आयडॉल २०२२ पुरस्काराने सन्मानित झालेले मंगेश माधवराव पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते .

 

यासह विश्वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष कांतीलालजी आग्रवाल , विश्वस्त मनोजशेठ आग्रवाल , कार्यकारी संचालक आकाश नागरे , विश्वस्त विजय कडू, किरणभाऊ पहिलवान , मनिष फुलपगार , कुंभारी गावाचे सरपंच प्रशांत घुले तसचे ग्रामस्थ रामनाथ आव्हाड , दत्तात्रय आव्हाड, आशोकराव वक्ते यांसह गावातील ज्येष्ठ नागरीक व पालकवृंद उपस्थित होते . या सर्वांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . शालेय विद्यार्थ्यांनी परेडद्वारे मानवंदना दिली .

सदर कालावधीत वसतिगृह विद्यार्थ्यांच्या बँण्ड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . याच सोहळ्यातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत पहिल्या तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला . कृष्णाली होन , तनिष्क चव्हान, हरिशरण कुमार , आराध्य रोकडे , युग कुदळे , नैतिक निकुंभ या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशभक्ती जागृत केली . देशभक्तीपर नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकुन घेतली . मुख्य अतिथी म्हणून भाषण करत असताना मंगेश पाटील यांनी अण्णा उर्फ लहानुभाऊ नागरे यांच्या आठवणींना उजाळा देत अण्णा म्हणजे एक कट्टर देशभक्त आणि या देशभक्ताच्या विचारधारेवर आधारीत या शाळेत शिक्षण घेणे म्हणजे अहो भाग्यचं आणि नक्कीच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व व एक आदर्श नागरीक या शाळेत घडेल असे विचार आपल्या भाषणातून मांडले .

 

अशाप्रकारे देशभक्ती पर गीत – संगीत, नृत्य, स्वातंत्र्या वरील रांगोळी , चित्रकला पेंटिंग ,भाषणे यासारख्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी नटलेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे सुत्रसंचालन भक्ती टिळेकर, पलक ठक्कर, लब्धी कोठारी , स्वरा रोहमारे या विद्यार्थ्यांनी केले तर शाळेचे प्राचार्य सुरेश शिंदे यांनी आभाराची सुत्रे हाती घेत उपस्थितांचे आभार मानले .

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे