महाराष्ट्र
चांदवड तालुक्यात काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
चांदवड तालुक्यात काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
चांदवड प्रतिनिधी :-चांदवड तालुक्यात काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात आज दुपारी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जवळपास तळेगाव रोहि गावातील बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
यात तळेगाव रोहि येथील गट न ९८२ मधील खंडू कारभारी डफाळ व प्रभाकर कारभारी डफाळ यांच्या शेतातील मका व कांदा पिकांचे जास्त नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कृषी विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. हवामान खात्यानं येत्या दोन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.