टाकळी येथे समाजिक कार्यकर्ते सोमनाथ डफाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण
टाकळी येथे समाजिक कार्यकर्ते सोमनाथ डफाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण
कोपरगाव प्रतिनिधी -: जय मल्हार मित्र मंडळा तर्फे क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. त्यांचा भव्य बक्षिक वितरणाच्या समारंभ नुकताच टाकळी येथे पार पडला.सामजिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान असणाऱ्या टाकळी येथील जय मल्हार मित्र मंडळातर्फे टाकळी येथे क्रिकेटचे सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यांचा बक्षिक वितरणाच्या समारंभ ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांच्या हस्ते पार पडला यामध्ये विजेत्या संघांला अकरा हजार रू बक्षिस वितरण व ट्रॉफी दुसरे बक्षीस मा सभापती सुनिल भाऊ देवकर यांच्यावतीने पांच हजार रू प्रदान करण्यात आले.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी जय मल्हार मित्र मंडळाचे कार्य समाजासाठी आदर्श निर्माण करणार आहे. या मंडळाने जय मल्हार मित्र मंडळाचे संस्थापक कै विजय जगन्नाथ देवकर यांच्या स्मरणार्थाने टाकळी गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. गावातील ग्रामस्थांच्या अडचणी समजुन घेऊन योग्य ते मार्गदर्शक करणे सर्व समाजातील मुलांना एकत्र करून क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे अशा सर्व कार्यात पुढाकार घेऊन सामजिक कार्य केले व आलेल्या संघांना मार्गदर्शक केले
याप्रसंगी मा सभापती सुनिल भाऊ देवकर.सरपंच संदीप देवकर,संजय देवकर.निलेश देवकर,शशिकांत देवकर,अजय देवकर.विजय मधुकर देवकर.अनिल देवकर.बाबासाहेब.देवकर.राहुल सोनवणे ,गणेश फोटो ग्राफर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.