ब्रेकिंग

सातभाई महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत संकलित मूल्यमापन गुणांच्या आधारे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनियर कॉलेज कासली तालुका कोपरगाव या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा व किमान कौशल्य बिल्डिंग मेंटेनन्स या विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी दिली.

विज्ञान या शाखेत कु ऋषिकेश पोपट त्रिभुवन ८५% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला आहे तर द्वितीय क्रमांक कु धनंजय मनोहर परहे ८२.८३% टक्के गुण तर तृतीय क्रमांक कु इमरान शकील पटेल ८२.५% गुण मिळवून यशस्वी झाले आहे.

तसेच किमान कौशल्य बिल्डिंग मेंटेनन्स या विभागात प्रथम क्रमांक कु कल्याणी अशोक बागुल हि ९५.६६ टक्के गुण मिळवून यशस्वी झाली आहे तर द्वितीय क्रमांक कु आरती राजेंद्र पाटणकर ८९.८३ टक्के गुण तर तृतीय क्रमांक कु सुजित संजय लाटे ८९ टक्के गुण मिळवून यशस्वी झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, प्राचार्य विजय कापसे, प्राचार्य विजय जाधव, प्रा विलास, चव्हाण, सोनाली कापसे, रेखा दिवे, निलेश देवकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे