श्री.भागीनाथ आसने यांना केद्राई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

श्री.भागीनाथ आसने यांना केद्राई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कोपरगाव प्रतिनिधी – केद्राई कृषी व ग्रामविकास संस्था यांच्या तर्फे दिला जाणारा केद्राई गौरव पुरस्कार 2021 ब्राम्हणगांव चे प्रगत शेतकरी भागीनाथ बाबासाहेब आसने यांना स्वामी रिसॉर्ट,लासलगांव (नाशिक ) दिनांक 1/8/2021 या दिवशी सौ.दुर्गाताई तांबे पाटील (नगराध्यक्षा :संगमनेर नगरपालिका) यांच्या हस्ते सपत्निक प्रदान करण्यात आला.
यावेळी मा.श्री.वसंत शिंदे (संस्थापक अध्यक्ष :कार्डस्) ,मा.श्री. हंसराजजी वडघुले साहेब (संस्थापक :शेतकरी संघर्ष संघटना , महाराष्ट्र ) ,मा.श्री सचिनजी होळकर साहेब (सरचिटणीस :नाशिक जिल्हा कॉग्रेस कमिटी, कृषीतज्ञ,लेखक,साहित्यिक ),मा.शिवाजीराव ढेपले आदी मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला आणि याचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते .
