चेन्नंई विद्यापिठामार्फत मानद डॉक्टरेट पदवीने येवल्यातील अरूण मोरे सन्मानित…
चेन्नंई विद्यापिठामार्फत मानद डॉक्टरेट पदवीने येवल्यातील अरूण मोरे सन्मानित…
येवला प्रतिनिधी :- येवला तालुक्यातील बोकटे गावचे सामाजिक कार्यकर्ते.अरूण दिनकर मोरे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त संस्था चेन्नई विद्यापिठ तामिळनाडू मार्फत आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हसिटीचा बॅगलोर येथील दिक्षांत समारंभात तीस डिसेंबरला सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानपुर्वक गौरविण्या आले.
यावेळी मास्टर व्ही.बाबु विजयन संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक व्हीजयन ॲकॅडमी सल्लागार मंडळ , एशिया इंटरनॅशनल कल्चर अकादमी.डॉ.के.ए.मानोकरन आमदार डॉ.जे.हरिदोस .सेवानिवृत्त न्यायाधीश श्री.डॉ.ज्ञानसेकरन मुख्य संरक्षक सल्लागार डॉ.शिवप्पा केपी ऑन्कोलाॅजी थेरपिस्ट HCG हाॅस्पिटल बॅगलोर डॉ.एम.राजगोपालन ग्रिदार गालासा सत्यनारायण डॉक्टर नोटरी भारत सरकार कर्नाटक डॉ.गुणवंता मंजू कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अध्यक्ष अथमश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठान श्रीमती मिना महादेव कर्नाटक प्रेस क्लब कौन्सिल महिला उपाध्यक्षा बंगलोर श्री.श्री.स्वामीजी डॉ.रविचंद्रन श्री.गंगामॉ देवी शक्ती पिठम् आणि चॅरिटेबल ट्रस्ट दक्षिण भारत व माननीय श्री. भाऊराव पवार एकलव्य संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपुर्वक मानद डॉक्टरेट पदवी अरूण दिनकर मोरे यांना बहाल करण्यात आली.याबद्दल मुकुंद आव्हाड ,हितेश दाभाडे , देविदास गुडगे पाटील ,.किरण ठाकरे, शब्बीर इमानदार ,गजानन देशमुख,कौसरभाई, बाबासाहेब शिंदे,प्रवीण खडांगळे, योगेश गायकवाड, संदेश पवार, ऋतिक पवार, सचिन माळी, अरविंद पवार, किरण मोरे आदीसह त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.