आरोग्य व शिक्षण

माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणगाव येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन

माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणगाव येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी :ब्राह्मणगाव येथे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा चे तालुकाउपाध्यक्ष व शिवबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.अनुरागभाऊ येवले व संत जनार्दन स्वामी SJS हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले होते.. या शिबिरासाठी माननीय स्नेहलता ताई कोल्हे यांनी वेळात वेळ काढून भेट दिली.. यावेळी २७२ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स यांनी रुग्णांना मार्गदर्शन करत अनेक मोफत सुविधा प्रधान केल्या व मोफत औषधे देखील रुग्णांना देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. स्नेहलता ताई कोल्हे होत्या- ताईनी यावेळी आपल मनोगत व्यक्त करत आस्ताने त्यांचा जन्म समाज सेवेसाठीच असल्याचे सांगितले व अनुराग भाऊ येवले व त्यांच्या सहकारी यांनी जो समाज उपयोगी कार्यक्रम घेतला त्याचे कौतुक केले.यावेळी समस्त ग्रामस्थ व शिवबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आमदार ताई यांचा वाढदिवसाच्या निम्मीत सत्कार करण्यात आला..

यावेळी स. सा. का. चे संचालक निवृत्ती भाऊ बनकर,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम,मार्केट कमिटीचे संचालक बापूसाहेब सुराळकर,माजी सभापती सुनील देवकर,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम भाऊ पाचोरे तालुकाउपाध्यक्ष अनुराग भाऊ येवले जिल्हा उपा अध्यक्ष शरद नाना थोरात,ज्येष्ठ मार्गदर्शक चांगदेव आप्पा आसणे, अशोक अण्णा येवले,जगन नाव आहेर,सिताराम आप्पा जाधव,बाळासाहेब अप्पा आहेर, सरपंच साईनाथ भाऊ आहेर,उपसरपंच रामदास पवार,पोलीस पाटील रविंद्र बनकर ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब बनकर,साहेबराव आबा येवले,चांगदेवजी आहेर अण्णासाहेब वाकचौरे, बाबू बाप्पा वाकचौरे,धनंजय मामा हुळेकर,बाळासाहेब आसणे, सदस्य अशोक अष्टेकर,अरुण भाऊ महाजन, सुनील नाइक,संजू दादा वाघचौरे,,संतोष आहेर सर, दादा पाटील आसणे,कैलास येवले,भिकाजी तांबे मामा,पांडू तात्या डफाळ, नाटेगावचे सरपंच विकास भाऊ मोरे,शिवाजी येवले,बाळासाहेब जी गंगावने,आशिष भाऊ वाकचौरे,रामजी आसणे, करंजी चे अजय भिंगारे,टाकळी चे पप्पू भाऊ देवकर,नाटेगांव चे ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ मोरे,डॉक्टर गोरक्षनाथ मोरे,विजयजी कालेकर,सुधाकर जाधव,गंगाराम बनकर,अर्जुन नरोडे,सचिन आसणे,पत्रकार सोमनाथ डफाळ, कृष्णा भाऊ दौडे, विलास साबळे, नानासाहेब शिंदे,किरण भाऊ साळवे,नितिन शिंदे,वैभव शिंगाडे,देवा भागवत,किशोर घुमरे,तुषार शिंगाडे,शुभम येवले,राजिक खाटीक,प्रभाकर खुरसणे,राहुल गाजरे,प्रतीक माळी,प्रसाद डफाळ,विक्रम पवार,राहुल अष्टेकर, गौरव घूमरे, शरद साळवे, मंगेश साळवे तसेच संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल चा संपूर्ण स्टाफ, शिवबा प्रतिष्ठान चे सर्व युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ ब्राह्मणगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी अनुराग भाऊ येवले यांनी प्रास्ताविक केले तसेच निवृत्ती भाऊ बनकर,तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा शरद नाना थोरात,सभापती सुनील देवकर,अजय भिंगारे साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष,तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विक्रम भाऊ पाचोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. कार्यक्रमाचे आभार ब्राह्मणगाव चे पोलीस पाटील रवींद्र बनकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गंगावने यांनी केले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे