डॉ.सौ.वृषाली विजय ससाणे ( खटावकर ) यांनी मिळविली पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.
डॉ.सौ.वृषाली विजय ससाणे ( खटावकर ) यांनी मिळविली पुणे विद्यापीठाची पी.एच.डी..
कोपरगाव सुभद्रानगर येथील रहिवाशी डॉ वृषाली विजय ससाणे (खटावकर) यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेतून “भूजल गुणवत्तेचा अंदाज बांधणी ” या विषयांवर डॉ. डी.वाय पाटील संशोधन केन्द्र च्या गाईड डॉ.अलका कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर करत डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे.
डॉ वृषाली यांचे महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स कॉलेज कोपरगाव येथे झाले तर उच्च महाविद्यालयीन शिक्षण संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव महाविद्यालयात पूर्ण केल्या नंतर संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव याच संस्थेत गेल्या १४ वर्षांपासून या पदावर नोकरी करत असून. या वेळी डॉ वृषाली यांनी बोलतांना सांगितले की, अत्यंत खडतर परिस्थितीत घर संसार संभाळून हा अभ्यासक्रम चिकाटीने आम्ही पूर्ण केला. माझ्या या यशात माहेर इतकीच माझ्या सासरचाही खारीचा वाटा असून मला वेळोवेळी शिक्षणासाठी माझ्या पतीचे प्रोत्साहन मिळाले म्हणून मी यात यशस्वी झाले.
डॉ वृषाली यांच्या या यशाबद्दल संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजिंग डायरेक्टर अमित कोल्हे, प्राचार्य. डॉ. ए.जी ठाकूर सिव्हिल डिपार्टमेंट चे विभागप्रमुख डॉ. एम. एस. पुरकर यांच्या सह सिव्हिल डिपार्टमेंट स्टाफ यांनी डॉ. वृषाली ससाणे मॅडम यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.