छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेला खेळाचे साहित्य वाटप.
संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो.8788193839
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेला खेळाचे साहित्य वाटप.
कोपरगाव प्रतिनिधी- : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्ताने ब्राम्हणगाव येथील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेला खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.ब्राम्हणगाव येथील क्रीडापटू तरुणांना बट ,बॉल ,स्टंप ,हॉलीबॉल,बुध्दीबळ यासारख्या खेळाच्या साहित्य ब्राम्हणगावचे भूषण सेवानिवृत्त निरीक्षक मुंबई पोलिस मा.श्री. रमेश भिकाजी शिंगाडे साहेब यांच्या स्व. पत्नी संध्या रमेश शिंगाडे यांच्या स्मरणार्थ संस्थेला दिले तसेच सामाजिक रत्न पुरस्कार प्राप्त मा.श्री.अनुराग येवले पाटील यांनी संस्थेस बॅडमिंटन दिले.
ब्राम्हणगावातील तरुणांना विविध खेळामध्ये रुची निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.