आरोग्य व शिक्षण
ब्राम्हणगाव येथे जि. प. शाळेमध्ये श्रावण आसने यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेळाचे साहित्य वाटप
ब्राम्हणगाव येथे जि. प. शाळेमध्ये श्रावण आसने यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेळाचे साहित्य वाटप
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक श्रावण आसने पाटील यांच्यातर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देण्यात आले यामध्ये क्रिकेट किट, व्हॉलिबॉल, बाॅस्केटबॉल,फुटबॉल,बॅडमिंटन अशा विविध प्रकारचे खेळणीचे साहित्य आज देण्यात आले
विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा,चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून श्रावण आसने यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात
यावेळी शाळेतील शिक्षक ,ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, ग्रा.प सदस्य भास्कर शिंगाडे व ग्रामस्थ उपस्थित होते