ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे येथे मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न
ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे येथे मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न
पालघर प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील सफाळे ता. पालघर येथे ग्रामीण शिक्षण संस्था, पंडित राजगुरू महाविद्यालयात शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र कोसबाड आणि ग्रामीण शिक्षण संस्था सफाले येथे मधमाशी पालन प्रशिक्षण पार पडले.
प्रा. उत्तम सहाने यांनी मधमाशीच्या जाती, परागीभवन, पेट्यांची देखभाल, हाताळणी, विविध उत्पादने याविषयी सखोल माहिती दिली. मधमाशी पालक काळू वांगड यांनी नैसर्गिक मधमाशी पेटीत कशी भरावी, कोती माशी चे विभाजन यांचे प्रात्यक्षिक दाखविले.
मधमाशी पालक दीपक पाटील यांनी मधपालन मधील आव्हाने आणि निराकरण याविषयी प्रबोधन केले. संस्थेचे सचिव अडव्होकेट श्री दिपक भाते यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अनिलकुमार वझे यांनी केले सूत्रसंचालन कदम सरांनी केले. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाला ८५ शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.