ब्राम्हणगाव येथील सोसायटी परिसरात पाणीच पाणी
ब्राम्हणगाव येथील सोसायटी परिसरात पाणीच पाणी
कोपरगाव प्रतिनिधी -: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे. ब्राम्हणगाव परिसरात आज दुपारी प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता. दुपारपासुन पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने साधारणपणे दुपारी ३ दरम्यान एक ते दोन फूट पावसाचे पाणी ब्राम्हणगावमधील सोसायटी जवळ साचले.ब्राम्हणगावात आज दुपारनंतर पावसाने प्रचंड थैमान घातलं. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यामुळे सुरु झालेल्या पावसाने ब्राम्हणगावकरांची धडकी भरवली होती.
येत्या काही दिवसात नवरात्र उत्साह साजरा होणार आहे या परिसरात असेच पाणी साचले तर नवरात्र उत्साहात येणाऱ्या भाविकांची हाल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरी ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीने लक्ष घालुन या परिसरातील योग्य ती कामे करून ग्रामस्थांची व येणाऱ्या भाविकांची हाल होणार नाही अशी चर्चा होताना दिसत आहे
या परिसरात ग्रामपंचायत काय निर्णय घेइल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे