वास्तव क्रियेशन आयोजित भव्य कला गुणगौरव सोहळा २०२२ कुर्ला मुंबई येथे लयभारी संपन्न
वास्तव क्रियेशन आयोजित भव्य कला गुणगौरव सोहळा २०२२ कुर्ला मुंबई येथे लयभारी संपन्न
महाराष्टातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या वास्तव क्रियेशन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात या टीममधले कलाकारांना सिनेमामध्ये अभिनय करण्याची संधी देणार अशी ग्वाही महाराष्तील विनोदी अभिनेते भूषण कडू यांनी दिली,
संपूर्ण महाराष्ट्रतील काम करणाऱ्या नवोदित कलाकारांचा वास्तव क्रियेशन टीमतर्फे गुणगौरव , मार्गदर्शन, तसेच फॅन्सी ड्रेस, रांगोळी या स्पर्धाचे बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आले.
यावेळी काजूपाडा,कुर्ला मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले
विनोदी अभिनेते भूषण कडू, मॉडेल अभिनेत्री जुईली शेलार, अमर भाताडे, समीर कुळे, कृष्णा येद्रे, सौ. गराटे मॅडम, अनिल गलगली,बाबू नाईक , आरिफ खान, रत्नाकर शेट्टी, शाहीर प्रिती भोवड, शाहीर प्रफुल्ल पुजारी या आदी मान्यवरांनी उपस्थित राहून वास्तव क्रियेशनचा मान वाढवला आणि सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. बाल कलाकार ऋतुजा शिंगारे यांनी मान्यवरांच्या समोर लावणी सादरीकरण करून सर्वांची वाह वाह मिळवले आणि कार्यक्रम हा रंगदार आला,वास्तव क्रियेशन टीमतर्फे घेण्यात आलेल्या निसर्गरम्य कोकण माझा फॅन्सी ड्रेस स्पर्धतील प्रथम क्रमांक तृप्ती रवींद्र पाठारे,(सांताक्रूझ)
द्वितीय क्रमांक ,मोहिनी चौधरी(ठाणे) आणि तृतीय क्रमांक – पुंजल सौदळकर यांनी बाजी मारली ,
तसेच रांगोळी स्पर्धेतील मोठा गट मधले विजेते प्रथम क्रमांक – विलास रहाटे(रत्नागिरी) द्वितीय क्रमांक – मयुरी पातरे ( नागपूर)आणि लहान गटातप्र थम क्रमांक -अक्षय वहाळकर,(रत्नागिरी)द्वितीय क्रमांक – आरती पांचाळ (नेरुळ) या सर्वांना बाजी मारली कार्यक्रमाला शोभा आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालक स्वरूप आणि प्रमोद सूर्यवंशी सरांनी सांभाळू कार्यक्रम बहारदार केला. या कार्यक्रमात विनोदी अभिनेते यांनी अनेक कलाकारांची मिमिक्री करून आम्हा सर्वांना हसवले आणि मार्गदर्शन पण केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयेश कातकर, सुरज हातणकर, प्रमोद सूर्यवंशी, प्रमोद दामोदर, स्वरूप बाईत, साईनाथ बाईत ,समिधा शुंगारे , विनय फटकरे, कुणाल हळदणकर, ऋतुराज दिवेकर, सोनाली शिंदे, ऐश्वर्या गुरव , सुरज कुवार ऋतुजा शिंगारे, दीपाली शिंगारे, आरोही आव्हाड, रोशनी हातणकर, प्रिती भोवड, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले.