आपला जिल्हा

गौतम सहकारी बँकेच्या संचालक पदी तुकाराम हुळेकर यांची बिनविरोध निवड

गौतम सहकारी बँकेच्या संचालक पदी तुकाराम हुळेकर यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी : बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या गौतम सहकारी बँकेवर संचालकपदी तुकाराम एकनाथ हुळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील नावाजलेली बँक असा नावलौकीक असलेल्या गौतम बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.कोपरगाव तालुक्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या गौतम सहकारी बँकेची 2023/28 साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग समूहाच्या इतर संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे.


कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना व परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली होती. उद्योग समूहाच्या अनेक सहकारी संस्थांबरोबरच गौतम सहकारी बँक देखील आ.आशुतोष काळे यांनी माजी आमदार अशोक दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे. गौतम बँकेच्या 2023 ते 2028 या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीत संचालक पदासाठी निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण 13 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 13 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे सुधाकर वामनराव दंडवते, विजय यादवराव रक्ताटे, सौ.रुपाली जालिंदर संवत्सरकर, सिंधुबाई रायभान रोहोम, राजेंद्र माणिकराव ढोमसे, कमलाकर रावसाहेब चांदगुडे, बाबुराव कारभारी थोरात, तुकाराम एकनाथ हुळेकर, श्रीकांत विठ्ठल तिरसे, बापूसाहेब सीताराम वक्ते, उत्तम बन्सी भालेराव, बापूराव दगू जावळे, सुनिल भास्कर डोंगरे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर झालेल्या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून गौतम बँकेला प्रगतीपथावर ठेवण्यासाठी विश्‍वासाने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे