नाशिक मध्ये अनाधिकृत अथेलेटीक्स स्पर्धेचे आयोजन – प्रसाद राजोळे
नाशिक मध्ये अनाधिकृत अथेलेटीक्स स्पर्धेचे आयोजन – प्रसाद राजोळे
नाशिक प्रतिनिधी : नाशिक मध्ये अनाधिकृत अथेलेटीक्स स्पर्धेचे आयोजन दि. २६ ते २८ मे २०२३ या दरम्यान एक स्पर्धा “लाईट व्हिजन स्टेट अथेलेटीक्स मीट २०२३” . नाशिक मधील द ओव्हल ग्राऊंड, महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी, नाशिक असुन मंगेश राऊत यांनी आयोजित केली आहे. नाशिक अथेलेटीक्स फाऊंडेशन नाशिक हि संस्था, महाराष्ट्र अथेलेटीक्स असोसिशनशी कुठल्याही प्रकारे संबंधीत नाही तसेच त्यांनी कुठलीही परवानगी न घेता अनाधिकृत पणे हि संस्था हि स्पर्धा भरवत आहे.
महाराष्ट्र अथेलेटीक्स असोशिएशन चे सचीव श्री. सतीश उचील यांनी देखील या स्पर्धे वर हरकत घेतलेली आहे. नाशिक आयुक्तालय व महाराष्ट्र पोलिस अकॅडमी ,प्रसाद राजोळे जिल्हा राज्य तांत्रिक अधिकारी यांनी सदर अर्ज सादर केला असून स्पर्धेत भाग घेणाऱ्यां खेळाडूने आपल्याच जवाबदारी वर खेळावे ही स्पर्धा अनाधिकृत असुन खेळाडूं व सामान्य नागरीकांची फसवणूक थांबवावी म्हणून हा अर्ज सादर केला आहेत असे त्यांनी त्यांच्या प्रसिध्द पत्रिकेत केले आहे .