अंत्यसंस्कार करण्यापेक्षा देह दान करा – प्रबोधनकार सत्यपाल महाराज
अंत्यसंस्कार करण्यापेक्षा देह दान करा – प्रबोधनकार सत्यपाल महाराज
कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली, परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतिभ्रष्ट महाराज “दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती’चे तर अंधश्रद्धेचे धोरण राबवून समाज नासवत आहेत.
अशा पाखंडी महाराजांचा नाद सोडा, असे प्रबोधन सत्यपाल महाराज यांनी केले. विज्ञान युगात हल्ली समाजात महिलेच्या अंगात देवी येते, तर पुरुषांच्या अंगात देव येतो. असे पाखंडी बुआ समाजात अंधश्रद्धा पसरवून क्लेश निर्माण करतात. अशा पाखंडी बुवाबाजीकडे लक्ष वेधत त्यांनी तरुण, तरुणाईना छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज , डॉ. बाबासाहेबांच्या पुस्तकाचे वाचन करा.
अंधश्रद्धेपासून दूर राहा ,माझे मायबाप हो! आता ध्येयावर लक्ष केंद्रित करून राजकीय पक्षांच्या दऱ्या उचलणे बंद करावे, जुन्या रूढी-परंपरेला फाटा देत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा शरीररचना शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी यावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना आपला मृतदेहाचे ‘देहदान’ करावा असे आवाहन सप्त खंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी सुंदर नियोजन केले होते. तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.