ब्रेकिंग
कोपरगावात घुसला बिबट्या! पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, शहरात खळबळ
कोपरगावात घुसला बिबट्या! पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, शहरात खळबळ
कोपरगाव प्रतिनिधी -:कोपरगाव शहरातील बस स्टॅन्ड परिसरात आज रात्री दहा वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान बिबट्या अद्यापही बस स्टॅन्ड परिसरातील एका पडक्या जागेत लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोपरगाव शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. बस स्टॅन्ड या परिसरात हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी
विभागाच्यावतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत बिबट्याला जेरबंद करण्याचे मोहीम चालू करण्यात आलेली आहे. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकारी यांनी केले आहे.