‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा – पांडुरंग डफाळ
‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा – पांडुरंग डफाळ
कोपरगाव प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणूक-२०२३ मध्ये मतदान करण्यासाठी ब्राम्हणगाव मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळणार असल्याने ; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता जनसेवक पांडुरंग डफाळ यांनी मतदाराना विनंती करताना दिसत आहे.
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणूक-२०२३ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळणार असल्याने ; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता जनसेवक पांडुरंग डफाळ यांनी हाती घेतले आहे.लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, ब्राम्हणगाव येथे मागील काही वर्षांपासून विकास कार्य केले नाही. फक्त निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येतात, तसेच मागील पंधरा वर्षांपासून प्रमुख पक्षांनी तेच ते उमेदवार दिल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे.
यामुळे ब्राम्हणगावात मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डफाळ यांनी सांगितले.मतदान न करणे हा काही पर्याय नाही. मतदान करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार पसंत नसेल तर निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ हा पर्यायी विकल्प मतदार निवडू शकतो. या विकल्पाबाबत मतदारांना जागृत करणे, जनजागृती करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता ब्राम्हणगावचे जनसेवक पांडुरंग डफाळ यांनी मतदाराना विनंती करताना दिसत आहे