सुसरे येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुसरे येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाथर्डी प्रतिनिधी:पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे कै.प्रयागाबाई मोहन कंठाळी यांचे स्मरणार्थ मकरसंक्रांतीचे औचित्य साधून डॉ.कंठाळी क्लिनिक अहमदनगर व सुसरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये 156 जणांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन सुसरे गावचे सरपंच दादासाहेब कंठाळी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी राजेंद्र उदागे, नारायण उदागे,श्रीकांत मिसाळ, रघुनाथ कंठाळी, अंकुश कंठाळी,जनार्दन कंठाळी, मारुती मिसाळ,अशोक मिसाळ, ज्ञानेश्वर मिसाळ, नवनाथ मिसाळ,दिपक पवार ,अरविंद मुळे, सीमा कंठाळी,प्रसाद कंठाळी, नाना लोखंडे आदी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.या शिबिरात मेंदू विकार, संसर्गजन्य आजार,पोट विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार, श्वसनाचे विकार ,इसीजी चाचणी आदी विविध आजारांवर उपचार केले.
या शिबिरासाठी तज्ञ डॉ.प्रदिप कंठाळी व डॉ.तेजल कंठाळी यांनी रुग्णांवर उपचार करून औषध वाटप केले.या मोफत आरोग्य शिबिराने गावातील सामान्य गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच दादासाहेब कंठाळी, रामराव उदागे , श्रीधर कंठाळी यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिराला ग्रामस्थांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.