विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले- परशराम साबळे
विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले- परशराम साबळे
कोपरगाव प्रतिनिधी – स्त्रियांच्या साक्षरतेची वाट प्रकाशित करणारी पहिली स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच विद्येच्या खऱ्या अर्थाने देवता असल्याचे प्रतिपादन ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव येथे पहिली स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी साबळे बोलत होते.याप्रसंगी कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धरणगावकर, बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे प्रा विजय कापसे, साई शक्ती इंग्लिश मेडियम स्कूलचे प्रा विजय जाधव, दुग्ध उत्पादन व पशुधन महाविद्यालयाचे प्रा ज्ञानेश्वर मगर, निलेश देवकर रेखा दिवे आदि सह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
याप्रसंगी साबळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक भारतीय समाज सुधारक आणि कवियीत्री म्हणून सर्वांना परिचित होत्या तसेच त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून देखील ओळखले जात असे त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना श्रीवादाची जननी देखील मानले जात असे. स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केल्याने सावित्रीबाईंच फुले यांनाच खऱ्या अर्थाने विद्येची देवता संबोधने योग्य असल्याचे मत साबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच याप्रसंगी बालिका दिनाचे औचित्य साधत सुहानी शिंदे या विद्यार्थिनींचा देखील गौरव करण्यात आला.