समाज कल्याण व पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांना अनुदान वाटप
समाज कल्याण व पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांना अनुदान वाटप
कोपरगाव प्रतिनिधी- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव यांचे मार्फत दिव्यांग – दिव्यांग विवाह झालेल्या जोडप्यासाठी ३० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून, सदर दिव्यांग- दिव्यांग विवाह झालेल्या चांदेकसारे येथील भाऊसाहेब कारभारी पारखे व अनिता भाऊसाहेब पारखे या जोडप्याच्या बँक खात्यावर सदर अनुदार वर्ग केलेबाबत पत्र लाभार्थीस चांदेकसारे येथे लाभार्थीचे घरीं जाऊन कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब साबळे , विस्तार अधिकारी पंचायत बबनराव वाघमोडे व प्रशांत तोरवणे , तसेच सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण विभाग व पंचायत समिती कोपरगाव यांचेकडून सन २०२२-२३ या वर्षात जिल्हा परिषद ५ टक्के सेस फंडातून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी ३५ लाभार्थींना प्रत्येकी १३ हजार रुपये प्रमाणे ४ लाख ५५ हजार रूपये अनुदान मंजूर झाले असून ते लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणेत आले आहे.
तसेच समाज कल्याण विभाग २० टक्के जिल्हा परिषद सेस फंडातून २१लाभार्थ्यांना कडबाकुट्टी घेण्यासाठी प्रत्येकी २६ हजार रुपये प्रमाणे ५ लाख ४६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणेत आले आहे. तसेच २६ महिलाना शिलाई मशीन घेणेसाठी प्रत्येकी ६ हजार ५०० रुपये प्रमाणे १ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणेत आले आहे. तसेच इयत्ता ५ वी ते १० वी शाळेत शिक्षण घेणाऱ्या २७ मुलींना लेडीज सायकल घेणेसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये प्रमाणे १ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणेत आले आहे.