आरोग्य व शिक्षण

युवकांनो आपण इतरांना नोकरी देऊ इतपत प्रबळ बना- पोलिस निरीक्षक देसले

युवकांनो आपण इतरांना नोकरी देऊ इतपत प्रबळ बना- पोलिस निरीक्षक देसले

कोपरगाव प्रतिनिधी – सध्याचा युवकांची मानसिकता ही नोकरी करण्याची असून मालक होऊन इतरांना नोकरी देण्याची नसल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी करत युवकांनो आपण इतरांना नोकरी देऊ इतपत प्रबळ व्हावे असे आवाहन मानव कौशल्य विकास असोसिएशन कोपरगाव येथील कार्यालय शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव व मानव कौशल्य विकास अंतर्गत नाशिक व नगर जिल्ह्यातील महिला व पुरुषांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम लवकरच सुरू होत असून त्याचा मुख्य कार्यालयाचा शुभारंभ कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या शुभहस्ते व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

जाहिरात

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर, पंचायत समिती कोपरगाव च्या अधिकारी कविता बर्वे, मनीषा पाटील, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थाप्रमुख परशराम साबळे सचिव सुचित्रा साबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी देसले यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारतात एके काळी प्रथम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी संकल्पना होती परंतु आता यात बदल करत आजच्या युवकांनी प्रथम नोकरीस प्राधान्य देत फक्त नोकरी शोधण्याच्या मागे पळत असून परंतु आता यात युवकांनी बदल करत स्वतः चा छोटासा का होईना व्यवसाय सुरू करत इतरांना आपण नोकरी देऊ इतपत प्रबळ बना असे आवाहन करत संस्था प्रत्येक महिला व पुरुषांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी जे रोजगार प्रशिक्षण देणार आहे हा त्याचा मानस अतिशय योग्य असून यातून नक्कीच व्यापार वाढीला चालना मिळेल यात दुमत नाही असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक देसले यांनी मानव कौशल्य विकास असोसिएशनच्या कार्यालय शुभारंभ प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सातभाई यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेली रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना अतिशय उत्तम असून यातून काही प्रमाणात का होईना बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी यात सहभागी होत स्वतः मालक होत आपण आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन सातभाई यांनी केले.

या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष परशराम साबळे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुका सुपरवायझर यांना ओळखपत्र व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या यशस्वी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा देखील सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी बापूसाहेब डांगे, महेंद्र झपाटे, महेश आहेर, आशिष देवळालीकर, अशोक सोनवणे, विलास चव्हाण, निलेश देवकर, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय कापसे यांनी तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे