आरोग्य व शिक्षण

कै. निवृत्ती धोंडीबा आसने यांच्या स्मरणार्थ कमानीचे भूमिपूजन

कै. निवृत्ती धोंडीबा आसने यांच्या स्मरणार्थ कमानीचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवाशी व उत्कृष्ट अभियंते वास्तुकला प्लॅनर्सचे प्रोप्राइटर किसन निवृत्ती आसने (के.एन आसने ) ,कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दि १५ सप्टेंबर २०२१ रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणगाव येथे कै. श्री. निवृत्ती धोंडीबा आसने ( मा. सरपंच)यांच्या स्मरणार्थ भव्य अशा प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.

ब्राम्हणगाव मध्ये नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कै .निवृत्ती धोडिबा आसने यांनी सलग दोन पंचवार्षिक गावाचे सरपंच म्हणुन काम बघितले आहे. गावा मध्ये अनेक घरकुल योजना ,पाणी पुरवठा योजना राबविल्या आहेत त्यानी हयातीत सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे आणि यांचा हाच सामाजिक कार्याचा वारसा आजही सुरू असून त्यांचा ही सामाजिक कृतज्ञता जपून केलेले प्रवेशद्वार उभारणीचे कार्य हे आजच्या समाजासाठी आदर्शवत असल्याचे गौरऊदगार ब्राम्हणगाव करांनी व्यक्त केले आहे.

या प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने पाटील , वास्तुकला प्लॅनर्स प्रोप्राइटर किसन निवृत्ती आसने (के.एन आसने),इंजिनियर किरण आसने, बाबासाहेब जगताप , सोमनाथ आंबीलवादे, शाळेचे मुख्याध्यापक झालटे सर ,जोशी सर, वाकचौरे सर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे