ब्राम्हणगावातही शाळेची घंटा वाजणार; ४ ऑक्टोबर पासुन शाळा सुरू
ब्राम्हणगावातही शाळेची घंटा वाजणार; ४ ऑक्टोबर पासुन शाळा सुरू
कोपरगाव प्रतिनिधी : राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेपासून शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील कोविड स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता ५ वी ते नववी वर्ग सुरू होणार आहे. सर्व कोविड नियमांचे पालन करून ब्राम्हणगावातील माध्यमिक विद्यालय शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी ते नववी च्या सर्व मुलांनी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे .सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांचे संमतीपत्र भरून देणे बंधनकारक आहे ते संमती पत्र भरून वर्ग शिक्षकांकडे द्यावे.महत्वाची सूचना सोमवारी फक्त सर्व पाचवी ते नववी चे मुलेच उपस्थित राहतील मुलींनी शाळेत यायचे नाही. याची नोंद घ्यावी.
आणि इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व मुलींनी मंगळवारी शाळेत यायचे आहे.इयत्ता १० वीचे वर्ग १००% भरेल याची पालकांनी व विद्यार्थीनी नोंद घ्यावी.