संवत्सर पेट्रोल पंपावरील मॅनेजर चा पेट्रोल भरण्याचा कारणावरून खून
संवत्सर पेट्रोल पंपावरील मॅनेजर चा पेट्रोल भरण्याचा कारणावरून खून
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील जुन्या नागपूर-मुंबई हायवेवर संवत्सर हद्दीतील कांदा मार्केट जवळ नव्याने सुरू झालेल्या विशाल दिलीपराव जगताप यांच्या मे.गुरुराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर काल गुरुवार दि २८ जून रोजी अमोल धोंडीराम मोहिते यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून काल गुरुवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजे दरम्यान पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपले काम करत असताना एम एस १७ सी डब्ल्यू ९१०४ या पल्सर मोटरसायकल वरून तीन अज्ञात इसम पंपावर आले व त्यातील दोन्ही इसम मोटारसायकल वरून खाली उतरले व मला धक्काबुक्की करू लागले असता तितक्यात आमचे व्यवस्थापक भोजराज बापूराव घनघाव हे त्या दोन्ही इसमाना माझ्या माणसाला का मारताय असा जाब विचारायला लागले असता त्याचा राग त्या दोघांना आला व त्यांनी एका धारदार चाकूने आमच्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक भोजराज बापूराव घनघाव राहणार दहेगाव बोलका यांच्या पोटात व खांद्यावर चाकूने सपासप वार करून त्यांना जागीच ठार मारले व त्यांच्या पल्सर गाडीवरून पळून गेले त्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३१०/२०२३ भांदवी कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस करत आहे.
सदर घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे यांना मिळतात ते आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.