अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कोपरगाव येथे सत्याग्रह सभेचे आयोजन
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कोपरगाव येथे सत्याग्रह सभेचे आयोजन
कोपरगाव प्रतिनिधी -: आखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार व कॉंग्रेस विधीमंडळ पक्षनेते मा. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सत्ताधारी पक्षाची चालु असलेली हुकुमशाही, वाढती महागाई पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाद, शेतीमालाच्या घसरलेल्या किमती, सैनिक भरतीसाठीची फसवी अग्निपथ योजना, राष्ट्रीय संसाधने व सरकारी उद्योगांची विक्री, अदानी घोटाळा, मा. राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावुन खासदारकी रदद केल्याच्या निषेधार्थ तसेच मोदींनी लोकांचा कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची मोदी अदानी जोडीने चालविलेल्या राष्ट्रीय संपत्तीची लुट विरुध्द सुरु असलेल्या लढयात श्री. राहुल गांधी यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी भारतवासीयांमध्ये जनजागृती निर्माण करुन तात्काळ निर्णय घेण्यासाठी कोपरगाव तालुका कॉंग्रेस कमेटी, दि. ०३/०४/२०२३रोजी सकाळी १०.०३ वाजता महात्मा गांधी पुतळा येथे एकत्रित येवुन सत्ताधारी पक्ष करीत असलेल्या अन्याय, अत्याचाराबाबत शांतता व लोकशाहीच्या मार्गाने जय भारत सत्याग्रह सभा आयोजनाबाबत मा. तहसिलदार यांना निवेदन देणार आहोत.
हे सर्व करुन देखील गोरगरीबांना न्याय मिळाला नाही तर आम्ही मा. प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, आघाडीच्या संघटनांचे राष्ट्रीय प्रमुख विभाग आणि सेल प्रमुख माननिय कॉंग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली AICC च्या अंतर्गत विविध प्रकारच्या मोहीम आकारण्यात येईल