राजकीय
ब्राम्हणगावात पांडुरंग डफाळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
ब्राम्हणगावात पांडुरंग डफाळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पांडुरंग डफाळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
सरपंच पदाची निवड जनतेमधून होणार असल्याने पांडुरंग डफाळ यांना जिल्हा परिषद ,पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रदीर्घ अनुभव व माहिती असल्याने सरपंच पदासाठी जनतेने आग्रही भूमिका घेतली आहे.
कोणत्या प्रभागामधून कोण उभा राहणार, कोण इच्छूक आहेत. कोणाची तयारी कशी आहे. कोण उमेदवार चांगला, या बाबत जोरदार चर्चा ब्राम्हणगावांमध्ये सुरू असून, घरोघरी राजाकरणावर चर्चा झडत आहेत.
यावेळी निवडणूक अधिकारी गायकवाड साहेब ,नेवगेसाहेब अपक्ष उमेदवार पांडुरंग डफाळ ,सचिन डफाळ, सोमनाथ डफाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.